
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाने दीपावली-पाडवा कालावधीत जादा बसचे नियोजन आखले होते. सणानिमित्त गावी आलेले चाकरमाने आता परत फिरत आहेत. बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
प्रवाशांसाठी केलेल्या जादा बसच्या नियोजनामुळे दररोज सुमारे १.२४ लाख प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद अहमदनगर विभागात झाली आहे. मागील पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नही १२ लाखाने वाढले आहे.