
स्नेहालयातील वंचित मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून आ. नीलेश लंके यांनी त्यांच्या समवेत दिवाळी साजरी केली. स्नेहालयातील मुलांनी स्वागत गीत सादर करून आ. लंके यांचे तसेच उपस्थित सहकार्यांचे स्वागत केले. या विद्यार्थ्यांना भाऊबीजेनिमित्त फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्नेहालय संस्थेचे अनिल गावडे , ॲड.राहुल झावरे, अजय लामखडे, सुनील कोकरे, संदीप चौधरी, सुहास नगरे, भाऊ साठे, नितीन भांबळ, दत्ता खताळ उपस्थित होते.