आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे – वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
पुणे

सातारा पुण्यापासून जळगावपर्यंत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं कमी झाल्याचं समोर आलं असून, आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात थंडीची सुरुवात झाली असं म्हचलं जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी हे चित्र कायम राहणार असून, आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं होणार आहे.
हवामान विभागाच्या माहिनीनुसार नंदुरबार, अमरावती, जळगाव, भंडारा, नाशिक, पुणे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयांमध्ये किमान तापमान आणखी कमी होऊन थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यत आहे.
उत्तर भारतामध्ये पश्चिमि झंझावातामुळं हिमालयीन क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी आणि गारठा वाढवणारा पाऊसही बसरत असल्यामुळं त्या हवामानाचे परिणाम महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत.