‘उडान’ने रोखले ३०० हून अधिक बालविवाह
अहमदनगर - ‘बालविवाह मुक्ती मिशन’चे राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या पालखेडकर यांनी केले उद्धाटन

स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व चाईल्ड हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनाचे औचित्य साधून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांच्या हस्ते ‘उडान प्रकल्पा’चे लोकार्पण व ‘बालविवाह मुक्ती मिशन’चे उद्घाटन झाले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख, बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा येवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सूचित ताबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकांनी हवेत फुगे सोडून कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन बालकांचे सत्कार करत शुभेच्छा दिल्या.