
राज्यभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिव्यांची रोषणाई आणि फटाक्याच्या आतषबाजीत दिवाळीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला.
मात्र, दिवाळीच्या धामधूमीत अनेक ठिकाणी घर आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातही अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात रात्री १२ पर्यंत तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या २३ घटनांमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
पुण्याच्या शुक्रवार पेठेत फटकांच्या ठिणगीमुळे लाकडचा जुना वाडा पेटल्याची घटना घडली. शुक्रवार पेठेतील वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररुप धारण केलं. वाड्याला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
नागरिकांनी तातडीने अग्निशामक दराला कळवल्यानंतर मोठी दुर्घटना टळली. तर दुसरीकडे आपला मारुती मंदिराजवळील झाडाला देखील फटाक्यांमुळे आग लागली होती. धानोरी येथील विठ्ठल मंदिर येथे गवताला आग लागली होती.
पुण्यात कुठे घडल्या आगीच्या घटना?
१) वेळ राञी ०७•३८ – रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग
२) वेळ राञी ०७•४० – कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग
३) वेळ राञी ०८•१८ – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग
४) वेळ राञी ०८•२४ – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग
५) वेळ राञी ०८•५० – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग
६) वेळ ०८•५२ – घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग
७) वेळ राञी ०८•५७ – कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग
०८) वेळ राञी ०८•५८ – वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग
०९) वेळ राञी ०९•०० – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग
१०) वेळ राञी ०९•१३ – केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग