ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर विवाह सोहळ्यात दिडशे वऱ्हाडींना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

अहमदनगर

शिर्डी येथून जवळच काल रविवारी संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाली असून यात वधू पित्याचाही समावेश आहे. या सर्वांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

शिर्डी नजीक रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला तर सायंकाळी मोठ्या थाटामाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूचे अनेक वर्‍हाडी तसेच नागरिक उपस्थित होते. भोजन केल्यानंतर दहा ते पंधरा जणांना पोटदुखी व उलट्या होण्याचा त्रास जाणू लागला होता तर रात्री आठ वाजे नंतर जवळपास दीडशेहून अधिक व्यक्तींना उलट्या, जुलाब व पोट दुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने अनेकांनी उपचार घेण्याकरिता हॉस्पिटलकडे धाव घेतली. वधू पित्याला देखील पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाला.

विवाह सोहळ्यात येणार्‍या नागरिकांना अचानक त्रास जाणू लागल्याने नातेवाईक व आयोजकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत विषबाधा झालेल्या नागरिक साईनाथ रुग्णालयात तसेच साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याकरिता येत होते. साईबाबा रुग्णालयात जवळपास पस्तीस तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे शंभरहुन अधिक व्यक्तींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तसेच काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले. यातील एकजण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्ण समान्य विभागात आहेत. विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असून रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे