ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामपंचायतीचा शिपाई झाला सरपंच, दोन पिढ्या गावाला पाणी घातलं आता गावाने सरपंच पदावर बसवलं

अहमदनगर

राजकारणात काय होईल हे सांगता येणे मुश्किल आहे. परंतु बऱ्याचदा जनता जनार्दन असा काही चमत्कार करवते की अगदी होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते होऊन जाते.

परंतु हा नियम काही खासदारकी,आमदारकी सारख्याच मोठ्या निवडणुकांना लागू आहे असे नव्हे.

कारण याचा प्रयत्य आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांत देखील आला आहे. अहमदनगर मधील असं एक गाव आहे जेथे एका ग्रामपंचायत शिपायाने थेट सरपंच पदाची खुर्ची पटकावली आहे. विशेष म्हणजे या शिपायाच्या वडिलांपासून गावाला पाणी घालण्याचे काम केलं जात होते.

नामदेव किसन शिंदे असे या ग्रामपंचायत कर्मचारी तथा आताचे सरपंच यांचे नाव आहे. व ते गाव आहे संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचपद अनुसूचित जमातीतील व्यक्तीसाठी राखीव होते. या निवडणुकीसाठी आमदार बाळासाहेब थोरात, प्रणित आमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव किसन शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर त्यांनी आपल्या शिपाईपदाचा राजीनामा दिला होता.

दोन पिढ्या गावाला पाणी पुरविण्याची सेवा

नामदेव शिंदे तब्बल चाळीस वर्षांपासून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत तर विशेष म्हणजे त्यांचे वडील किसन शिंदे सायकलवर गावाला पाणी पुरविण्याचे काम करत होते.

म्हणजेच शिंदे कुटुंबीयांच्या दोन पिढ्या गावाला पाणी पुरविण्याची सेवा करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गावाने देखील त्यांच्या या सेवेची दखल घेतली असच म्हणावं लागेल. नागरिकांनी त्यांना ग्रामपंचायतीत विजयी करून थेट सरपंच पदी बसवत कामाची बक्षिसी दिली.

काय म्हणतात सरपंच नामदेव शिंदे

निवनियुक्त सरपंच नामदेव शिंदे यांनी अगदी नम्रभाषेत प्रतिक्रया दिली. ते म्हणाले, ग्रामस्थांनी आग्रह केला म्हणून मी निवडणूक लढलो. त्यात मतदारांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला.

आता मी चांगले काम करील.आमचे मार्गदर्शक विजय हिंगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने आता गावाचा विकास करणार आहे असे शिंदे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे