
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, राज्यभरातील एसटी वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.