
राज्यभरातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरच्या करंजीत मतदानानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराने धक्क्याने मृत्यू झाला आहे.
सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. मतदान कक्षाच्या बाहेर आल्यानंतर सुनील गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. सुनील गांधी काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे.