ब्रेकिंगमहाराष्ट्र
जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास अंतिम मुदत

जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास ३० नोव्हेंबर अंतिम मुदत.मुदतीत नंबर प्लेट बसविण्याचे श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटपणा रोखणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची स्पष्ट ओळख पटविण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.




