ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात संविधान दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर

संविधान दिन उत्साहात साजरा. आ. संग्राम जगताप यांचा सत्कार, संविधान उपदेशकीच्या पठनाने परिसर दुमदुमले.

समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन करण्यात आले. यानंतर संविधान रक्षक आमदार संग्राम जगताप यांना संविधान उपदेशकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुरेशभाऊ बनसोडे, प्रा. माणिक विधाते, परिमल निकम, अजय साळवे, संजय खामकर, रवींद्र कांबळे, रेशमाताई आठरे, लतीका पवार, विशाल कांबळे, संतोष पाडळे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, प्रकाश वाघमारे, सतीश शिरसाट, सुरेश वैरागर, समीर भिंगारदिवे, किरण गायकवाड, सुभाष वाघमारे, सुहास पाटोळे, विनोद कांबळे, संतोष नवसुपे, येसुदास वाघमारे, वैभव औटी, सौरभ कांबळे, दीपक सरोदे, सुजन भिंगारदिवे, गणेश कांबळे, शिवाजी भोसले, विजय कांबळे, गणेश केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात दिली. संविधान हे एका समाजापुरते नसून सर्व भारतीयांचे आहे. यामुळे देशात समता, बंधुता व स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला.

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली.

तसेच सुरेश बनसोडे म्हणाले की, संविधान दिन हा आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणि अधिकार-जाणिवेचा प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे आमच्या आयुष्याचे दिशा-निर्देशक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट दिली आहे. आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचे जतन, पालन आणि प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले पाहिजे असल्याची भावना व्यक्त केली.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे