ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

पुणे

पुणे शहर ‘विद्येचं माहेर’ घर मानलं जात. मात्र याच पुण्यात ‘ शालार्थ आयडी’ साठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावसाहेब मिरगणे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली असतानाही पैसे घेऊन शालार्थ आयडी दिला जात असल्याने शिक्षण विभाग अधिकच बदनाम होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांना शालार्थ आयडी’ नसल्याने त्या २०१६ पासून विना वेतन काम करत होत्या. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. हा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जून २०२५ रोजी सोलापूर विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे दाखल केला होता.

सदरचा प्रस्ताव ‘ई- ऑफिस’ मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले आरोपी मिरगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. या संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे आपली तक्रार नोंदवली.तक्रार दाखल झाल्यानंतर १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या काळात लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तसेच २१ नोव्हेंबर रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी रावसाहेब मिरगणे, शिक्षण उपनिरीक्षक, यांनी तक्रारदाराच्या पत्नीची ‘शालार्थ आयडी’ मंजूर करून देण्यासाठी १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर शिक्षण उप निरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून १ लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. या घटनेनंतर रावसाहेब मिरगणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे