आयएमएस सीड च्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या आकर्षक उत्पादनांचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन.
अहमदनगर - सण दिवाळीचा, धमाका खरेदीचा..

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आयएमएस सीड सीने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे शहरात उद्घाटन चंदुकाका सराफ अँड सन्सच्या बारामती विभागाचे सीईओ विशाल परतवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवाळी निमित्ताने महिलांनी तयार केलेले खाद्य पदार्थ, कपडे, ज्वेलरी, आयुर्वेदिक उत्पादने, मसाले यांचे प्रदर्शन व विक्री हे या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हे प्रदर्शन नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात दि १ व २ नोव्हेंबर २०२३ रोजी खुले असेल, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. मेहता, उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, सीड सीच्या समन्वयक डॉ. ऋचा तांदूळवाडकर, प्रा. गौरी पाटील यांनी दिली.
देआसरा फाउंडेशन, चंदुकाका सराफ व सन्स त्याचप्रमाणे आय लव नगर यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविले असून चंदुकाका सराफ यांच्यातर्फे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी लकी कुपन काढण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी या उपक्रमाच्या समन्वयक डॉ.ऋचा तांदूळवाडकर यांच्याशी (९८५०३७०१४१) संपर्क साधण्याचे आवाहन उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस यांनी केले आहे.
छोट्या महिला उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयएमएस सीड सी अनेक वर्ष प्रयत्नात आहे. देआसरा फाऊंडेशन उद्योजकांच्या मदतीसाठी १० वर्ष कार्यरत असून शेकडो उद्योजकांनी व्यवसायास नवी दिशा दिली आहे.