ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरच्या मराठा कार्यकर्त्याचे खरमरीत पत्र

अहमदनगर

दसरा मेळाव्यात आपले भाषण थांबवून मराठा आरक्षणासाठी बांधिल अल्याचे सांगण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नसल्याने एकीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू झाले आहे.

तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा विषय न घेतल्याने कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्याची घटना घडल्यानंतर सदावर्तेही आक्रमक होऊन टीका करू लागले आहेत. यामुळे वातावरण चिघळत असताना नगरमधील मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते आणि स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेऊन अवमानच करण्यापेक्षा मराठा समाजावर गरळ ओकून वातावरण बिघडविणाऱ्या सदावर्ते यांना दोन महिने स्थानबद्ध करावे, अशी मागणी तोडमल यांनी केली आहे.

तोडमल यांनी पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निर्दयी प्रकार घडला. तरीही मराठा समाजाने शांतता बाळगली. ज्यांची वकिलीची सनद जप्त झाली होती, असे समाजात तेढ निर्माण करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर गरळ ओकली. सदावर्ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भारतातील सर्वाधिक मोठी आणि शिस्तबद्ध झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुध्दा विरोध केला.

सोबतच मराठा समाजाची बदनामी होईल अशी वक्तव्य प्रसार माध्यमांतून केले. एकंदरीतच मराठा समाजाविषयी विकृत मानसिकता असलेल्या सदावर्ते यांनी आपले तोंड बंद केलेले नाही. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून काहींनी त्यांच्या आलिशान गाड्या फोडल्या.

आधीच विविध संकटांमुळे पिचलेल्या मराठा तरुणांना सदावर्ते उचकावत आहेत. तर दुसरीकडे सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदावर्ते फक्त मराठा आरक्षण विषय ऐरणीवर आला की मराठा समाजाविषयी असलेला द्वेष व्यक्त करतात. ते असे का करतात की त्यांना कुणी असे करायला सांगत आहे? तरीही त्यांना अद्याप मोकळेच सोडले आहे.

त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण मराठा द्वेषी सदावर्ते यांना महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी दोन महिने स्थानबद्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे