ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

निहारिका ब्युटी स्पा ॲण्ड इन्स्टिट्यूट च्या संचालिका शिल्पा लोखंडे मॅडम शी दिलखुलास गप्पा

अहमदनगर

संचालिका – सौ. शिल्पा लोखंडे.

निहारिका ब्युटी स्पा ॲण्ड इन्स्टिट्यूट.

गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर.

९२२६२१४२५५

पुणे तिथे काय उणे अशा पुण्यात शिल्पा मॅडम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७९ रोजी झाला.

शिल्पा मॅडम यांचे छोटेसे कुटुंब होते. आई वडील, शिल्पा मॅडम , व भाऊ. मुळात घरातली असो किंवा बाहेरची माणसांनी शिल्पा मॅडम वर भरभरून प्रेम केले.तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळ्यां कडून मान सन्मान शिल्पा मॅडम ला मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे.

पुण्यात औंध मध्ये शिवाजी विद्या मंदिर मध्ये शिल्पा मॅडम चे शिक्षण झाले. आणि नंतर FC काॅलेज मध्ये एज्युकेशन बारावी चे शिक्षण पुर्ण झाले. पण शिल्पा मॅडम नी शाळेत असताना च आठवी मध्ये च मनाशी ठरवून टाकले की ब्युटीशिअयन मध्ये करिअर करायचे..

त्यांनी एकदा जवळच्या मैत्रीणी कडून eye brow करून घेतले होते. त्यांना आवड असल्याने त्या लक्ष देऊन बघत असायच्या. आणि त्या हळूहळू बघून बघून शिकल्या. ही आवड लक्षात घेऊन त्यांनी पुण्यात लावण्या ब्युटी पार्लर मध्ये ३ वर्षाचा कोर्स केला.आणि भरपूर प्रॅक्टिस करून त्या स्वतः इंडिपेंडंट झाल्या. त्यातच १९९९ मध्ये त्यांचे लग्न झाले.आणि शिल्पा मॅडम अहमदनगर मध्ये स्थायिक झाल्या.

२००१ मधे अहमदनगर मध्ये शिल्पा मॅडम नी निहारिका ब्युटी पार्लर च्या नावाने पार्लर चालू केले. आणि त्यांच्या परीचयाची सुरुवात झाली. सुरवातीला वर्षभर जिद्द आणि चिकाटी सोडली नाही.

पहिल्याच दिवशी शिल्पा मॅडम ला क्लाईंट सुरू झाले. पण बिझनेस म्हटलं की चढ़ – उतार येतच राहतात. ऐक एक दिवशी एक ही क्लाईंट नसायचे. पण शिल्पा मॅडम नी त्यांचा दिनक्रम सोडला नाही. सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत पार्लर चालू ठेवायचे.

यात घरच्यांचा सपोर्ट खुप महत्वाचा पार्ट असतो. यात त्यांना त्यांच्या सासुबाईंनी खुप मदत आणि सपोर्ट केला. त्यांची मुले खुप लहान होती. शिल्पा मॅडम चे म्हणणे होते की केवळ आई ची अट्याचमेंट राहावी म्हणून त्यांनी मुलांना कधी ही एकटे सोडले नाही. त्या त्यांना पार्लर मध्ये घेऊन यायच्या.

तेव्हा पार्लर चांगले चालू‌ झाले होते.भरपूर विद्यार्थानी शिकायला आल्या. गरजू मुलींना शिल्पा मॅडम नी फ्री मधे काही प्रशीक्षण दिले. आणि त्यांना त्यांच्या पायावर सक्षम पणे उभे केले.

गव्हरमेंट तर्फे ५० मुलींच्या बॅचेस घेतल्या. पुढे आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असा आला की २००६ मध्ये मिस्टरांना ॲक्सीडेंड झाला. त्यांच्या माने ला स्पायनल धक्का लागल्यामुळे वर्ष भर बेडवर होते. डॉ . नी सांगितले की वर्ष भर ते फिरू शकणार नाही. कारण डावी साईड ला पॅरलाईज झाला आहे.

पण केवळ शिल्पा मॅडम मिस्टरांच्या इच्छा शक्ती च्या बळावर स्वतः‌ला उभे केले. आणि प्रसंगी दोन्ही मुलांचे शिक्षण आणि संगोपण हे पार्लर मुळे शक्य झाले. सर्वात महत्त्वाचे नवर्याची आणि मॅडम ची आयुष्याची जोडी बळकट आहे . आणि आज पर्यंत आहे.मॅडम ला प्रत्येक वळणावर त्यांच्या मिस्टरांनी साथ दिली आणि देतात.

आज शिल्पा मॅडम च्या पार्लर ला 23 वर्ष पूर्ण झाले आहे.

८ मार्च महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निहारिका ब्युटी स्पा ॲण्ड इन्स्टिट्यूट च्या संचालिका शिल्पा मॅडम ला आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम हाॅटेल स्विट होम मध्ये घेण्यात आला होता.

भाड्याच्या गाळ्या मध्ये १० बाय १० पार्लर मध्ये सुरुवात केली होती.

आता शिल्पा मॅडम चे श गुलमोहर रोडवर १ हजार स्केअर फुट मधे स्वतःचे पार्लर चालू आहे. आणि त्या अभिमानाने सांगत आहेत. आणि त्या खुप आनंदी आहेत.

शिल्पा मॅडम महिलांसाठी खास करून एक संदेश देत आहे की स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि त्या मुळे कोणत्या ही परिस्थिती मध्ये आपण मागे पडत नाही.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे