ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉफी शॉपच्या नावाखाली अय्याशीचे अड्डे, अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील चाळे, गर्भनिरोधक गोळ्यांचाही मोठा साठा जप्त

सिन्नर

शहरातील चौदाचौक वाडा परिसरातील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कॉफी शॉपमध्ये अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १६) सायंकाळी छापा टाकत तीन कॉफी शॉपमधील अय्याशीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कॉफी शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भनिरोधक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

काही वर्षांपासून सिन्नर शहरात ठिकठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत. याकडे सिन्नर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका सुजाण नागरिकाने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे तक्रार केल्याचे कळते.

त्यानंतर उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने थेट सिन्नर गाठत सांगळे कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावरील तीन कॉफी शॉपवर छापा टाकला. अचानक छापा पडल्याने कॉफीशॉप चालकांची धांदल उडाली. त्यांनी तेथून पळ काढला.

कॉफी शॉपमध्ये ९ ते १० अल्पवयीन मुले-मुली आढळून आली. या कॉफी शॉपमध्ये छोटे-छोटे कंपार्टमेंट करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यात बसण्यासाठी सोफ्याची व बेडचीही व्यवस्था करण्यात आली होती.

अंधारमय असणाऱ्या या कंपार्टमेंटमध्ये मुले व मुली अश्लील चाळे करीत असल्याचे यातून उघड झाले. कॉफी शॉप केवळ नाव असून, या शॉपमध्ये कॉफी किंवा चहाचा कुठलाही प्रकार दिसून आला नाही. या कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी तासाला २०० ते ३०० रुपये आकारण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले.

कॉफीशॉपची झडती घेतली असता येथे तब्बल ५० ते ६० वापरलेले कंडोम सर्वत्र पडल्याचे दिसून आल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत गिलबिले, विनोद टिळे, शांताराम नाठे, दीपक अहिरे, दिनेश बागूल, संदीप नागपुरे यांनी तिन्ही कॉफी शॉपमधील सर्व साहित्य उद्ध्वस्त केले.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गुन्हे शाखेच्या पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील कॉफी शॉपचालकांचे धाबे दणाणले आहे. सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे