
नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी पर्व या सणाच्या दिवसांमध्ये सराफबाजार, कापड बाजारात खरेदीदारांची गर्दी होते. मात्र येथे अवैध फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे पावला-पावलावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सराफ बाजाराकडे येणारे मार्ग मोकळे करावे.
अशी मागणी दि नाशिक सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्याकडे केली.