
अंबर प्लाझा संकुलातील घटना. सहा नागरिकांचे प्राण वाचले.
शहरात बसस्थानक परिसरातील अंबर प्लाझा या व्यापारी संकुलात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. यात दोन कार्यालये पूर्णपणे जळून खाक झाली. तर संपूर्ण दुसरा मजला व तिसर्या मजल्यावरील काही भागाला आगीची झळ बसली.
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा नागरिकांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुसर्या मजल्यावरील एका चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयाला आग (Fire) लागली. शेजारील एका कार्यालयालाही त्याची झळ बसली. कामकाजाचा वार असल्याने सर्वच कार्यालयात कर्मचारी होते. धूर दिसताच बहुतांश कर्मचार्यांनी इमारतीतून पळ काढला.
मात्र, दुसर्या मजल्यावर सहा नागरीक अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शिडी घेऊन दुसर्या मजल्यावर चढले व त्यांनी त्यांची सुटका केली. सायंकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.