ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा रुग्णालयात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा रुग्णालयाचा आढावा

जिल्हा रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत. या रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करावी व रुग्णांना योग्य उपचार मिळावेत. शासनाने रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयातील विविध मशिनरी सुरु आहेत की नाही, औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही, ऑक्सिजनची परिस्थितीची, बाल रुग्णालयातील कक्षाची माहिती घेतली.
यावेळी स्वच्छतेविषयी या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली.