
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार ६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुटी जाहीर केली आहे.
ही सुटी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. शासकीय परिपत्रकानुसार दरवर्षी गोपाळकाला, अनंत चतुर्दशी आणि महापरिनिर्वाण दिन या तीन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना शासकीय सुटी मिळेल. जोपर्यंत बदलाचा आदेश येत नाही तोपर्यंत या सुट्या लागू राहणार आहेत.