
अहमदनगर विभागातील माळीवाडा, सावेडी, सुपा व कोल्हार या बस स्थानकांच्या पुनर्बांधणी करिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून आ. संग्राम जगताप यांच्यासह सदर कामाचा आढावा घेतला. अशी माहिती खा.डॉ.सुजय विखे यांनी दिली आहे.
यावेळी आराखड्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि बस स्थानकाच्या पुनर्बांधणी करिता नेमण्यात आलेले वास्तुविशारद यांना सूचना दिल्या.
सदर बैठकीस भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, यंत्र अभियंता (चालन) रा.प. अहमदनगर श्री.मुकुंद नगराळे, विभागीय अभियंता ( स्थापत्य) रा.प. अहमदनगर श्री.संजय दरेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.