शब्दगंध साहित्य परिषदेचा श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय श्ब्दगंध समाजकार्य गौरव पुरस्कार जाहीर
अहमदनगर

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित 15 वे साहित्य संमेलन 2023 चे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दगंध समाजकार्य गौरव पुरस्कार श्रीनिवास बोज्जा यांनी जाहीर झाला या बाबतचे पत्र संयोजन समिती चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व सचिव सुनील गोसावी यांनी दिले.
सदर पुरस्कार रविवारी दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीनिवास बोज्जा यांचा कविवर्य ना. धो. महानोर साहित्य नगरी, पं. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, माळीवाडा, अहमदनगर येथे मान्यवरांचे शुभ हस्ते विशेष सन्मानीत करण्यात येत आहे.
समाजाच्या विविध घटकात उल्लेखनिय कार्य करणार्या राज्यभरातील व्यक्तींचा सन्मान सदर परिषदेचे वतीने केला जाणार आहे.
श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यात अग्रेसर काम केले आहे व करीत आहे.
विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थेचे वतीने बोल्हेगाव भागातील गरीब विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा सुरु करून अत्यंत कमी फी मध्ये सर्व सुविधा विदयार्थ्यांना प्राप्त करून दिले असून विशेष म्हणजे कामगारांच्या मुलांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
अहमदनगर येथे सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून या संस्थेचे वतीने गोविंदपूरा भागात सांस्कृतिक केंद्र निर्माण केले व त्या ठिकाणी ध्यान साधनेचे वर्ग विनामूल्य घेतले जात असून अनेक सामाजिक कार्य ही केले जाते. तसेच व्यवसायिक क्षेत्रात काम करीत असतांना दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्षे काम केले असून या संस्थेचे वतीनेही अहमदनगर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नाव लौकिक केले आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना समाजसेवक अण्णा हजारे यांचे आदर्श घेऊन अनेक सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेतला असून भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ही चांगले कार्य केले आहे.
राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना पत्नी सौ. वीणा बोज्जा यांना नगरसेविका करून प्रभागामध्ये चांगले कार्य करून त्यांना राज्यस्तरीय बेस्ट नगरसेविका अवार्डही प्राप्त झाले आहे.
या सर्व उपक्रमाची दखल घेत बोज्जा यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.