ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींच्या 5 नोव्हेंबरला निवडणुका

अहमदनगर

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पुढील महिन्यात उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी सायंकाळी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या, तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आणि मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यभरातील सुमारे 2 हजार 369 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी, तर नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यात 5 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात काल (मंगळवार दि.3) पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत.

दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

यानंतर 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे