ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मी, पाचपुते अन्‌ कर्डिले एकत्रच

अहमदनगर

साकळाईसह नगर तालुक्यातील विविध विकास कामांबाबत मी, आमदार बबनराव पाचपुते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले एकत्रच आहोत. विरोधकांनी कितीही आरडाओरड केली तरी नगर तालुक्यातील जनता गेल्या ५ दशकापासून आमच्या पाठीशी आहे, असे मत वाळकी येथील विकासकामाच्या भूमीपूजनप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, वाळकीचे सरपंच शरद बोठे, रवींद्र कडूस, दादाभाऊ चितळकर, अशोक झरेकर, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवण चोभे उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, की आम्ही तिघांनी संघर्षाची पूर्ण तयारी केली आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघातील प्रत्येक घटकाला प्रामाणिक न्याय देण्याचे काम केले. गेल्या वर्षभरात तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिघेही कार्यरत आहोत.

सर्व कार्यालय एकाच छताखाली

महसूलमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय, प्रांत, भूमिअभिलेख, नोंदणी कार्यालय व पोलिस ठाणे यांच्यासह तालुक्यातील महत्त्वाची सर्व कार्यालय एकाच छताखाली येणार आहेत.

पुढील आठवड्यात २५ कोटी रूपयांच्या महसूल भवनाचे भूमिपूजन करणार आहे.

वयोश्री, दिव्यांग साहित्य वाटपाने तालुक्यातील वयोवृद्धांना व दिव्यांग बांधवांसाठी राबलेल्या उपक्रमाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. व्हीआरडीईचे स्थलांतर रोखण्यात यश आले असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

सोशल मिडीयावर राजकारण ?

सध्या अनेकांनी फक्त सोशल मीडियावर आपल्या विरोधात पोस्ट करण्याचा धडाका लावलाय. तुम्ही सत्तेत असताना तालुक्यातील जनतेसाठी काय केले? अवघ्या तीन महिन्यात साकळाई पाणी योजनेच्या शासकीय सर्व्हेक्षणाचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने आजवर स्वप्नवत असलेली योजना प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद आहे. तालुक्याच्या युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी पाचशे एकरावर एमआयडीसी उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

वाळकी तालुक्याची राजधानी

शिवाजी कर्डिले म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक गाव, वाड्यापर्यंत रस्त्यांचे जाळे विणले असल्याने तालुक्यातील विकासाला चालना मिळणार आहे. वाळकी हे बाजार गाव असल्याने नगर तालुक्याची राजधानी असल्यासारखे वाटते. तालुक्याच्या बहुतांश भाग हा शेती व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे