
गुरुवारी राज्यभरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. काही ठिकाणी गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. मात्र पुण्यात चार दिवसांपूर्वी डीजे लावू नका असा सांगणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 21 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मावळमध्ये समोर आला आहे. मुलाचे निधन झालं आहे त्यामुळे घरासमोर डीजे लावू नका अशी विनंती मारहाण झालेल्या व्यक्तीने केली होती.
मात्र 21 जणांनी मनात राग धरुन त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.
मावळमध्ये गणपती मिरवणुकीदरम्यान डीजे लावू नका, मुलाचे निधन झाले आहे असं म्हटल्यामुळे रागाच्या भरात 21 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरु आहे.