ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नाशिकमध्ये उद्या ‘देव द्या, देवपण घ्या’ हा अनोखा उपक्रम

नाशिक

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात असे आवाहन ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी केले आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे तसेच निर्माल्य नदीपात्रात विसर्जीत केल्याने गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी सुविचार मंच व विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो.

यंदाचे या उपक्रमाचे तेरावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी किती समितीकडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात.

यंदा चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत ‘देव द्या देवपण घ्या’ उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना आकर्षक असे पिवळ्या रंगाच्या टि शर्टस मोफत देण्यात येणार आहेत. या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. तसेच कृत्रिम तलाव देखील तयार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांकडून जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली आहेत. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे असे आवाहन केले आहे.

नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणारे नाशिककरांचे गणेशमूर्ती भाविकांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारण्यात आल्या आहेत.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, सोनु जाधव, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, संदिप उफाडे, अविनाश बरबडे, भावेश पवार, कुणाल सानप, कोमल कुरकुरे, गौरी घाटोळ, जयंत सोनवणे, प्रणाली शिंदे, रोहित कळम्बकर, वैष्णवी जोशी, सुजित सोनवणे, भाग्यश्री जाधव, ललित पिंगळे, जयश्री नंदवाणी, अक्षय नेर, दुर्गा गुप्ता, वैभव बारहाते, दिपाली जाधव, शुभम पगार, स्मिता शिंदे, प्रथमेश पवार, आकाश खरे, योगेश माळोदे, मदन म्हैसधुणे, किशोर वाघ, योगेश निमसे, ओम निकम, संदिप आहिरे, युवराज कुरकुरे, अतुल वारुंगसे यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे