सावेडी भागातील लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रम च्या माध्यमातून निराधार उपेक्षितांसाठी मानव सेवा
अहमदनगर

निराधार उपेक्षितांच्या मानव सेवेसाठी नेहमी पुढे आहे.
ज्यांचे कोणी नाही अशा वृद्धांसाठी आश्वासक आणि काळजी घेणारी वातावरण प्रदान करणे तसेच त्यांचे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य सुनिश्चित करणे, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश.वृद्ध सेवा हीच ईश्वर सेवा.
वृद्धाश्रमात एक निराधार व आजारी महिला मदतीच्या अपेक्षेने आल्या पण त्यांची अवस्था खूपच वाईट होती , त्यांच्याकडे पाहून मेडिकल ट्रीटमेंट ची खूप गरज आहे एवढे निदर्शनास आले. त्या दृष्टीने तिथल्या दोघी संचालिका उमा सारिका यांनी त्यांचे चे कप करून घेतले असता रक्ताचे प्रमाण ४.५, संधीवात, कंबरे खालील भाग पूर्ण निकामी झाले.
त्यानंतर त्यांना उमा आणि सारिका यांनी हाॅस्पिटल मध्ये ५ दिवसासाठी ॲडमिट केले असता ३ रक्ताच्या बॅग त्या सोबत गोळ्या औषधे दिल्याने त्यांचे आता hb ७.५ झाले. आणि जेवण सुधारले. त्याच प्रमाणे इम्युनिटी पॉवर वाढली. आणि खूप दिवसांनी पोटभर जेवल्या.
तसेच त्यांच्या चेहऱ्यावर खुप वेगळाच आनंद पाहिला मिळाला.
त्यांनी या कुटुंब वृध्दाश्रम चे मनापासून आभार मानले, अशी सेवा भविष्यात आपल्याकडून घडो. हीच ईश्रचरणी प्रार्थना.
अधिक माहितीसाठी कुटुंब वृध्दाश्रम ऑफिस – सारिका – 81778 24805