ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यात गणेश उत्सवासाठी 200 स्वच्छतागृह

पुणे - 3 व्हॅनिटी व्हॅन, पोलिस अन् मनपा कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही सुविधा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

गणेशोत्सवसाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना 3 व्हॅनिटी व्हॅन स्वरुपात हिरकणी कक्ष, तसेच पोलिस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाचे शेवटचे 3 दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. दरवर्षी यासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छता गृहांआभावी अडचण होत असते. ही अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, पुणे शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जगात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून हजारो भाविक गणेश दर्शन आणि अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात.

त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छतागृहांआभावी मोठी अडचण होते. ती दूर करण्यासाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, व्हॅनिटी व्हॅनच्या स्वरुपात तीन हिरकणी कक्ष आणि पोलीस तथा मनपा कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. यावेळी गणेशभक्तांची गैरसोय टळणार असून, उत्सवाचा आनंद सहज लुटता येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे