ब्रेकिंगमहाराष्ट्र
महिला विडी कामगारांचे कसबा गणपतीस साकडे – गणराया, विडी उद्योगावरील संकट दूर कर, रोजी रोटी दे
सोलापूर

धूम्रपानविरोधी कायद्यामुळे विडी उद्योगावर संकट आले. त्याने सोलापुरातील ६५ हजार कामगार कुटुंबीयांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला. हे संकट दूर व्हावे, सर्वांची उपजीविका टिकून राहावी यासाठी या उद्योगातील कामगारांनी रविवारी कसबा गणपतीची महापूजा केली.
चंद्रतारा विडी उद्योगातील महिलांच्या पुढाकारातून ही अनोखी पूजा बांधण्यात आली होती. राकेश कोळी, सचिन भरडे यांना पूजेचा मान देण्यात आला होता. मंडळाच्या पूजा समितीचे संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. अनिल भरडे, संजय शिराणी, ईरय्या स्वामी, अमित जगताप, रमेश गंगेरी, संतोष हारके, जगदीश वनारसे आदी उपस्थित होते. सोलापूर विडी उद्योग संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तिवाडी यांनी कामगारांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.