ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पालकांनी आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा – मा. नगरसेविका सौ.वीणाताई बोज्जा

अहमदनगर

बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल मध्ये पालकांसाठी मोदक स्पर्धा

प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये विदयार्थ्यांच्या महिला पालकांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते या वेळी विजेत्यांना मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून सौ गीता सातपुते व सौ. लीना सोन्नीस उपस्थित होते.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेश स्थापने निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वेळी मोदक स्पर्धे मध्ये एकूण 40 महिला पालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अश्विनी काळे, द्वितीय क्रमांक सौ. शितल वैराळ तृतीय क्रमांक सौ. राजश्री टीपरे व उत्तेजनार्थ सौ. सुनीता सातपुते असे चार बक्षीस देण्यात आले व सहभागी महिलांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या वेळी उपस्थित असलेल्या सर्व पालकांना सहजयोग ध्यान साधने बाबत माहिती देऊन कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम ही सहजयोग परिवाराच्या वतीने घेण्यात आला. या वेळी अनेक महिलांना थंड चैतन्याची अनुभूती ही प्राप्त झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता गांगर्डे यांनी केले, स्वागत सौ. दीपाली हजारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. आरती हिवारकर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे कोशाध्यक्ष संदीप गांगर्डे, वैष्णवी नजन व डान्स टीचर शुभम भालदंड सर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे