ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सातारा मांढरदेव येथील काळेश्वरी देवीचे मंदिर 28 सप्टेंबरपर्यंत बंद

भाविकांना दर्शनासाठी परिसरातील संभामंडपात ठेवणार उत्सवमूर्ती

मांढरदेव येथील काळेश्वरी देवीचे मंदिरच्या मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे हे मंदीर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय नको, म्हणून प्रशासनाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी येथील सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांची पूर्ण निराशा होणार नाही. या काळात भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मांढरदेव येथील काळेश्वरी किंवा काळूबाई देवीचे मंदिर महारष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी उत्सव काळातच नव्हे तर दररोज देखील भाविक दर्शनसाठी गर्दी करतात. मात्र, देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या काळात भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे. हे मंदीर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या दिवसात भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कसे आहे काळूबाईचे मंदिर

देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते साताऱ्यातून 20 कि.मी. अंतरावर आहे. मंदिर लहान असुन त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरिल डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठान आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असुन वनराईने नटलेला आहे.

स्वयंभू देवी

मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे. तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह हे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे