
गत काही दिवसांपासून कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता या चर्चेला मंदिर समितीने पूर्णविराम दिला आहे. मराठा समाजाचा रोष पाहून मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाच्या यासंबंधीच्या भावना शासनाला कळवण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर दिली.