ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहज ध्यानाने अध्यात्मिक उंची बरोबर सामाजिक उंची पण वाढते – प्रा. नितीन पवार

अहिल्यानगर

अनिल मकोणे यांची म. रा. पोलीस पाटील असो.च्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सन्मान..

सहजयोगी पोलीस पाटील श्री अनिल मकोणे रा. मौजे अंमळनेर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन च्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसार समन्वयक प्रा. नितीन पवार यांचे हस्ते सहज भुवन, गोविंदपुरा, अहिल्यानगर येथे सन्मान करण्यात आले या वेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे मा. जिल्हा सामन्वयक श्रीनिवास बोज्जा, अमोल यावलकर, घुगरे सर, अशोक तरकसे, रावसाहेब भोपळे बनोटे अप्पा, कुंडलिक ढाकणे व विठ्ठल जाधव, मनोज वाकचौरे अनिल गवळी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना प्रा. पवार म्हणाले सहजयोग हा साधारण योग राहिलेला नसून हा योग आज संपूर्ण जगातील 140 देशा पेक्षा जास्त देशातील साधक मोठया प्रमाणात सहजयोग ध्यान साधना करीत असून ही ध्यान साधना केल्यामुळे अध्यात्मिक उंची बरोबर सामाजिक उंची पण वाढते व याचाच प्रत्येय म्हणजे अनिल मकोणे यांची निवड आहे.

या वेळी सत्काराला उत्तर देतांना पोलीस पाटील अनिल मकोणे म्हणाले मी गेल्या वर्षभरा पासून सहजयोग ध्यान साधना नित्य नियमाने करीत असून मला सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयकही फायदा झाला असून आज माझी जिल्हा अध्यक्ष पदी निवड म्हणजे प. पु. माताजींनी मला सेवा केल्या बद्दल दिलेला प्रसाद आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रम चे स्वागत कुंडलिक ढाकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय ठेंगणे यांनी मानले. या वेळी अहिल्यानगर सह संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, लोणी, राहाता, राहुरी, सुपा सह जिल्ह्यातील सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे