ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको

अहमदनगर प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात बुधवारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा समाजाला 50% तुनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी मराठा नेत्यांकडून यावेळी करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिलेली आहे .

ही मुदत 13 ऑक्टोबर रोजी संपणार असून त्यानंतर नगर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे