सोहम अकॅडमी ला मल्लखांब प्रात्यक्षिक साठी प्रथम क्रमांक – नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर प्रतिनिधी

स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या १२ व्यां वर्धापन दिन व जगातील १० शाळांमध्ये निवड झाली या निमित्त आयोजित जल्लोष नगरकारांचा या कार्यक्रमात मल्लखांब चे उत्कृष्ट प्रात्यक्षिक केल्या बद्दल मल्लखांब मध्ये ऑल इंडिया गोल्ड मेलेडीस्ट श्री. योगेश म्याकल यांच्या सोहम अकॅडमी ला प्रथम क्रमांक चे बक्षिस प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र फिरोदिया यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.
नगर शहरातील स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल जगातील सर्वोत्कृष्ट शाळांत गणली गेली आहे. या शाळेला जगातील सर्वोत्कृष्ट तिसऱ्या क्रमांकाची शाळा असल्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
स्नेहालय ही अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणारी समाजसेवी संस्था आहे. या संस्थेला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या संस्थेने सुरू केलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलला आता जगात तिसऱ्या क्रमांकाची शाळा असल्याचा पुरस्कार नुकताच मिळाला.
जल्लोष नगरकरांचा हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी नगर शहरातील नागरिकांनी लक्षणीय उपस्थिती लावली होती.
तसेच या कार्यक्रमासाठी बाल साहित्य पुरस्कार विजेत्या डॉ. संगीता बर्वे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र फिरोदिया, टेक्निकल लीडर ओमनिव्हा यु एस ए आनंद कुलकर्णी, मानद संचालक स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल राजेंद्र शुक्रे आणि अध्यक्ष स्नेहालय संजय गुगळे प्रमुख उपस्थितीत होते.