ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
तनपुरे साखर कारखाना १५ वर्षे भाडेतत्त्वावर, जिल्हा बँकेत ठराव मंजूर
अहमदनगर प्रतिनिधी

राहुरीतील डॉ. बा.बा. तनपुरे कारखान्यावर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज थकबाकीमुळे जप्तीची कारवाई केली असून बँकेकडून कारखाना पंधरा वर्षांवर भाडेतत्त्वावर देण्याबाबत ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.
कारखान्यावर पुन्हा शासनातर्फे प्रशासकीय अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्ती करण्यात आली होती. गेल्यावर्षी कारखाना बंद पडला व आगामी गाळपासाठीचा हंगाम सुरू होण्याची शक्यता देखील धूसर झाली आहे. त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढतच चालली. याच अनुषंगाने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 28 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तसा ठरावही संचालक मंडळाने मंजूर केलेला आहे.