ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा उद्योग केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर प्रतिनिधी

महिनाभर चालणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी लाभार्थींची मुलाखतीद्वारे होणार निवड

जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या विषयावर आधारीत एक महिना कालावधीचे निशुल्क व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नव्याने उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या जिद्दी, होतकरू युवक-युवती व महिलांसाठी फॅशन डिझायनिंग, दुग्ध प्रक्रिया, पैठणी साडी निर्मिती, बंग निर्मिती, होम अप्लायंस रिपेअरिंग, खाद्य पदार्थ निर्मिती, डिजिटल फोटोग्राफी, मसाले निर्मिती आदी विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे प्रारंभ 1 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

या संधीचा होतकरू युवक युवती, सुशिक्षित बेरोजगार, बचत गटातील महिला, तसेच नव्याने उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या लाभार्थींनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, नाशिक विभागीय अधिकारी अलोक मिश्रा, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (अहमदनगर) प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय किंवा 0241-2957747 / 9561737747 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

नोंदणीसाठी https://mced.co.in/Contact_Us/Enquiry/ ही लिंक देण्यात आली आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे