
पुणे शहरात कॉलेजने नवीन विक्रम केला आहे. देशात प्रथमच अशी कामगिरी या महाविद्यालयाने केली आहे. यामुळे पुणेकरांनी पुन्हा करुन दाखवल्याचे म्हणावे लागले.
पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हटले जात आहे. विविध प्रकारच्या शिक्षणाची दारे पुण्यात खुली झाली आहेत. पुणे विद्यापीठ देशातील नामांकीत विद्यापीठांमध्ये मानले जाते. तसेच कृषी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रज्ञान शिक्षणाच्या अनेक शाखा पुण्यात आहेत. देशातील लष्कराली बळ देणाऱ्या अनेक संस्था आहेत.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीए पुण्यात आहे. आता पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने नवीन विक्रम केला आहे. देशात अशी कामगिरी करणारे ते एकमेव कॉलेज ठरले आहे.
काय केले मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेजने
पुणे येथील मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेजने हरित उर्जा उत्पादनासाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे. कॉलेजने 5 मेगावॅटचा सोलार प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढवून 7 MW पर्यंत झाली आहे.
देशातील एखाद्या कॉलेजने सोलार प्रकल्पाची उभारणी करण्याचा विक्रम प्रथमच केला आहे. 2021 पासून कॉलेज या प्रकल्पावर काम करत होता. आधी 2 मेगा वॅटचा प्रकल्प कॉलेजने उभारला. त्यानंतर आता 5 MW चा सोलार प्रकल्प उभारुन ही क्षमता 7 MW पर्यंत केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सोलर मोहिमेतंर्गत कॉलेजने हा प्रकल्प उभारला आहे.