क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
युवराज सिंग दुसऱ्यांदा झाला बाबा, चिमुकल्या परीचं नाव ठेवलं खूपच खास

भारतीय क्रिकेट संघातील चॉकलेट हिरो असणाऱ्या युवरजा सिंगच्या घरी आता एक गुड न्यूज आली आहे. कारण युवराज सिंगच्या घरी आता पाळणा हलला आहे. युवराज सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला. कारण युवराज आणि हेझल कीच यांच्या घरी आता एका नन्ही परीचं आगमन झालं आहे. या चिमुकलीचं नाव या दोघांनी खुपच खास ठेवलं आहे.
युवराजने आज एक ट्विट केलं आणि त्याने ही बातमी सर्वांना दिली आहे. युवराजडने म्हटले आहे की, ” आमच्या कुटुंबात एका राजकुमारीचे आम्ही स्वागत करत आहोत. ”
युवराजने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये युवराज आणि हेझल हे दोघे दिसत आहेत. त्याचबरोबर आता त्यांच्या घरात आलेली राजकुमारीही आहे. युवराजचे हे ट्विट सध्याच्या घडीला सर्वत्र चांगलेच व्हायरल झाले आहे आणि सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.