2024 च्या निवडणुकीत भाजपला भीमटोला देण्याची गरज – रोहित पाटील

भाजपच्या काळात महापुरूषांचा अपमान होताना दिसत आहे. कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करते तर कुणी आंबेडकर, शाहु फुले यांच्या विचारांचा अपमान करते आहे, आता यांना टोला देण्यासाठी आपण मेहनत घेण्याची गरज आहे, असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान रोहित पाटील म्हणाले की, आपल्याला आपल्या रक्ताचे पाणी करावे लागले तरी चालेल.. पण येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायचीच आणि दिल्लीला महाराष्ट्राची काय ताकद आहे हे दाखवून द्यायची. आणि हीच वेळ आहे ताकद दाखवून द्यायची.’ पुढे ते असेही म्हणाले, भाजपच्या काळात महापुरूषांचा अपमान होताना दिसत आहे. कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करते तर कुणी आंबेडकर, शाहु फुले यांच्या विचारांचा अपमान करते. ज्या फुले दाम्प्त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला त्यांचा अपमान होत असेल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत भाजपला भीमटोला देण्याची गरज आहे.
पवारांची साथ कधी सोडणार नाही
अनिल देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना गृहमंत्रीपदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांची 14 महिने तुरुंगवारीही झाली होती. 14 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडलेले अनिल देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात आहे. शरद पवार गटाची सध्या कोल्हापुरात जाहीर सभा सुरू आहे. या सभेत बोलताना अनिल देशमुख यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. अनेक महिन्यांनी परमवीर सिंह यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी म्हटले, अनिल देशमुखांवर मी जे आरोप केले आहेत त्यात काही तथ्य नाही. त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. मी ऐकीव माहितीच्या आधारावर हे आरोप केले होते. परंतु, हे होता होता 14 महिने उलटले. 14 महिने मला तुरुंगात काढावे लागले. मी त्यांना सांगितले होते, मी शरद पवारांची साथ कधी सोडणार नाही. 14 महिन्यांनी मी बाहेर आल्यानंतर आज मी खंबीरपणे शरद पवार यांच्याबरोबर उभा आहे.
केवळ ईडीच्या धाकाने पळाले
अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले आपले सहकारी आपल्याला सोडून भाजपाबरोबर गेले आणि त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे लोक आता शरद पवारांना सोडून गेले आहेत. मुळात हे लोक का सोडून गेले? केवळ ईडीच्या धाकाने हे सगळे लोक पळून गेले. परंतु, ईडीची भीती तर मलाही होती. ईडीचा धाक मलाही दाखवला होता. मला म्हणाले, हमारे साथ समझोता कर लो, परंतु, मी त्यांना म्हटले आयुष्यभर तुरुंगात राहीन पण तुमच्याबरोबर सौदा करणार नाही.