देशसेवा हिचं ईश्वर सेवा-प्रशांत नेटके पाटील
गुंडेगाव - मेजर कै. राजाराम हराळ यांचे पुण्यस्मरण निमीत्त विविध कार्यकम संपन्न

मेजर कैलासवासी राजाराम गंगाराम हराळ यांच्या पाचवे पुण्यस्मरण निमित्ताने ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज कर्जत यांचे जाहीर कीर्तन रुपी सेवा व माजी सैनिक मेळावा गुंडेगव येथे संपन्नः झाले.यावेळी आर्मड कौर (Armd Core)चे कर्नल उन्नीकृष्णन साहेब सी आर ओ Armd Core and Centre अहमदनगर व सुभेदार नवनाथ कात्ते साहेब तसेच सुभेदार माने साहेब व तीन हवालदार क्लर्क उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अभिनेते प्रशांत नेटके पाटील तसेच पोलिस निरीक्षक विवेक पवार साहेब कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर पीएसआय सोनवणे साहेब पीएसआय देशमुख साहेब व बरेचसे अंमलदार उपस्थित होते.
यावेळी आर्मड कौर यांच्या”साथीया मिशन “या अभियानांतर्गत ,”आफ्टर मी”या मराठी आवृत्तीचे तसेच “साथीया बुकलेट” चे वाटप सिनेअभीनेता प्रशांत नेटके पाटील यांच्या हस्ते माजी सैनिकांना करण्यात आले.यावेळी प्रशांत नेटके पाटील बोलतना म्हणाले,देशसेवेची कामे करणारे पिढ्यांनपिढ्या लक्षात ठेवले जातात.देशसेवा हिच ईश्वर सेवा,असे मला वाटते.
यावेळी धार्मिक क्षेत्रातील ह भ प आदिनाथ दानवे महाराज अध्यक्ष विश्व कल्याण वारकरी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच ह भ प मगर महाराज तसेच ह भ प शिवाजी कोकणे महाराज ह भ प भीमसेन महाराज ह भ प साहेबराव महाराज ह भ प माने महाराज ह भ प विठ्ठल फालके महाराज व नवनाथ वारकरी संस्थेतील 45 टाळकरी मुले उपस्थित होते.
यावेळी अनाथ मुलांसाठी असलेली सावली फाउंडेशन या निराधार मुलांच्या संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे साहेब व संस्थेतील अनाथ 40 मुले ज्यांना आई-वडील नसलेले असे 40 मुले कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी त्यांना हराळ परिवाराच्यावतीने अकरा हजार रुपयाचा धनादेश चेक सन्माननीय कर्नल उन्नी कृष्णन साहेब व प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अभिनेते प्रशांत नेटके पाटील ,तसेच सी आर ओ आर मोडकोर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने उपस्थित असलेले बाळासाहेब हराळ सभापती अर्थ व बांधकाम समिती अहमदनगर , अहमदनगर व सर्व क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे सर्व गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित राहिले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले.
याचप्रमाणे माजी सैनिक संघटना तसेच तसेच त्रिदल सैनिक संघटना गुंडेगाव व संघटनेतील सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सदस्य मंडळ उपस्थित राहिले त्याचप्रमाणे त्रिदल सैनिक महा समिती चे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रहार संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ मान्यवर मित्र मंडळ नातेवाईक सगेसोयरे व सर्व क्षेत्रातील मान्यवर राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल कार्यक्रमचे आयोजक कै.मेजर राजाराम हराळ यांचे सुपुत्र मा.सैनिक ,पोलिस अनिल हराळ व परिवार,यानी आम्ही सर्वांचे ऋणी आहोत असेच आमच्यावर प्रेम राहू द्या अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करून आलेल्या सर्वांचे मी व माझा परिवार ऋणी राहिल असे आभार व्यक्त केले.