
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या पहिल्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहिलेल्या एकूण १ हजार २० कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत.
या गैरहजर कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा दि. १५ एप्रिलला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याही प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बजावल्या आहेत.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ३७३४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कोणते कामकाज करायचे तसेच मतदान यंत्र हाताळणी संदर्भात प्रशिक्षण वर्ग प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दि. ७ एप्रिलला आयोजित करण्यात आले होते.