ब्रेकिंगमहाराष्ट्र
बाजारभाव मिळत नसल्याने माल रस्त्यावर फेकण्याची वेळ

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना शेतकरी पिकाला योग्य दर मिळत नसल्याने हैराण झाला आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की,शेतीमालाला बाजारभाव नाही, हमालीचा खर्चही निघत नसल्याने कष्टाने पिकविलेला माल माझ्या बळीराजाला रस्त्यावर फेकावा लागतोय. पण, बळीराजाचा हा आक्रोश सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नाही.
शेतकऱ्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणारे, सदैव आत्मस्तुतीमध्ये मग्न असणारे सत्ताधीश आपल्याला लाभले हे आपल्या “कृषिप्रधान” देशाचं दुर्दैव ..