४० महिलांचा सायकल रॅलीतून एकतेचा प्रसार, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्चमध्ये महिलांनी केली प्रार्थना
नाशिक

शहरातील ४० महिलांनी सायकलरॅली काढून शांतता अाणि एकतेचा प्रसार केला. येथील नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने ही रॅली आयाेजित करण्यात आली हाेती.
यावेळी फाउंडेशनच्या इतर सदस्य महिलाही विविध ठिकाणी उभ्याराहून त्यांनी रॅलीला प्राेत्साहित केले. या उपक्रमासाठी उपस्थित सर्व सायकलिस्ट यांनी हुतात्मा स्मारकयेथे वंदे मातरम् गीताद्वारे शहीद जवानांना मानवंदना दिली.
यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छावप्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉ.मनिषा रौंदळ यांनी मनोगत व्यक्त केले.
बच्छाव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला.‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’,‘हम सब एक है,’ ‘हिंदू मुस्लिमसीख, ईसाई, हम सब है भाई भाई’अशा घोषणांनी रॅली उत्साहात मार्गस्थ झाली.
सर्व सायकलिस्टनेकाळाराम मंदिर येथे दर्शन घेतले.त्यानंतर कुतबी मज्जिद येथे दाऊदीबोहरी समाजातर्फे रॅलीचे स्वागत करण्यात आले.
धर्मगुरूंच्या हस्ते रोपटे देऊन सायकलिस्टचे स्वागत केले. नाशिकचे पहिले आयर्न मॅन अमरमियाजी यांनी बोहरी समाजाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर शिंगाडा तलावाजवळील गुरुद्वारास भेटदेण्यात आली.
यानंतर डॉन बॉस्को शाळेसमोरील चर्चमध्ये प्रार्थना हाेऊन फादर यांनी सायकलिस्टसच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शिवशक्ती सायकल येथे राइडची सांगता झाली.
नाशिक सायकलिस्टचे सचिव संजय पवार व संचालक दीपक भोसले यांनी सर्वांचे आभार मानले. अध्यक्ष किशाेर माने यांच्या मार्गदर्शना खाली रवींद्र दुसाने यांनीया राइडचे नियोजन केले.