स्वातंत्र्य दिन प्रत्येक घरात साजरा होणे गरजेचे – मा. सैनिक सदाशिव मेहकरीकर
अहमदनगर

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार चे वतीने स्वातंत्र्य दिन साजरा.माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिना चा ७६ वा वर्धापनदिन १५ ऑगस्ट ध्वजारोहन उत्सव, शहीद स्मारक शांतीनगर सत्यभामा मंगल कार्यालय या ठिकाणी आनंदात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे 95 वर्षाचे माजी सैनिक आदरणीय श्री सदाशिव लक्ष्मण मेहकरीकर यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले व राष्ट्र गीत गायन झाले, ध्वजा रोहन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सेवा निवृत्त सैनिकांचे सह-परिवार सेवा-निवृत्ती महोत्सव साजरा केला .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी उपस्थितीत होते, तसेच सर्व आजी माजी सैनिक वीरनारी ,वीरपत्नी सह परिवार उपस्थित होते. या वेळी सदाशिव मेहकरीकर म्हणाले आम्ही देशासाठी संपूर्ण कुटुंब सेवेस वाहिलो. स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले याची किंमत मोजायची असेल तर प्रत्येकाने स्वातंत्र्य दिन आपल्या कुटुंबासाह घरी साजरा करायला पाहिजे असे ते म्हणाले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास गुंड म्हणाले,सैनिक सीमेवर असतांना त्यांच्या सौ.पत्नी घराचा कार्यभार निर्भीडपणे चालवतात,सासू-सासरे यांची सेवा, तसेच मुलांचा सांभाळ, त्यांची शिक्षण सर्व काही संस्कार व संस्कृती प्रमाणे करतात, म्हणुन त्यांना वीर पत्नी म्हणुन संबोधित केले. जेवढे योगदान देशासाठी सैनिकांचे आहे तेवढेच योगदान हे त्यांच्या पत्नीचे आहे असे सांगितले. त्या नंतर देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी देश भक्तांनी स्वतः च्या प्राणाची आहुती दिली व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले,त्यांच्या त्यागाला कधीच विसरू शकत नाही असे म्हणाले.
या वेळी संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेचे सचिव कॅप्टन श्री शेख सिकंदर साहेब यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्तविक संस्थेचे संस्थापक संजय वाघ यांनी केले.
या कार्यक्रमासाठी माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी खजिनदार बापूसाहेब फरताडे, सह.खजिनदार कुंडलिक ढाकणे, सह.सचिव ईश्वर गपाट, कॅप्टन साळवे, कॅप्टन मगर, सुभे.मेजर लक्ष्मण खराडे, सुभेदार सुरेंद्र खेडकर , कुलकर्णी साहेब, रनशिंग,रामदास केदार, संजय पालवे, अंबादास पालवे, बबन घोगरे, संजय ढाकणे, ससाणे, शेळके, निकम,मोईद्दीन शेख,व सर्व वीर नारी, वीर पत्नी तसेच सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते.