ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्वातंत्र्य संग्रामात लोक कलावंतांचा मोठा सहभाग – प्रशांत नेटके पाटील

अहमदनगर प्रतिनिधी

“हर घर तिरंगा” या मोहिमे अंतगर्त देशभरात राष्ट्रध्वज फडकवणार.

लोक कलावंतासोबत स्वतंत्रता दिवस या कार्यकमा अंतर्गत नगर शहरातील सर्वसामान्य लोककलावंतानी सुध्हा साजरा करावा म्हणुन सर्व सामान्य कुटुंबातील कलावंताना झेंडा वाटप,’चित्रपट व लोककलवंत संघर्ष समिती अध्यक्ष सिने अभिनेता प्रशांत नेटके पाटील यांच्या वतीने करण्यात येऊन त्यानी कलावंतानना 15ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व कलावंताचे स्वातंत्र्यातील महत्त्व सांगितले..

यावेळी बोलताना ते म्हणाले की,देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात लोककलावंतांनी शाहिरी, किवा वेगवेगळ्या कला सादर करुन समाजात जनजागृतिचे काम मोठ्या प्रमाणात करुन सहभाग घेतला. पुढे ह्यातील बरेच कलावंत स्वातंत्र्य सेनानी सुधा झाले.

जे पकडले  गेले अशा कितीतरी कलावंताना शिक्षा सुधा झाल्या. आज स्वतंत्रता दिवस असल्यानं या व या सारख्या सर्व स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारया विरांच स्मरण ह्वाव व सर्व लोककलावंतानी झेंडा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करावा.

तसेच येणारया काळातही कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करुन जनजागृति करावी असे आवाहन सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील यांनी केले.

यावेळी लोककलावंत भाऊसाहेब उडणशीवे, लोककलवंत सुभद्राबाई उल्हारे,नंदा शेरकर,हलगी वादक राहुल वैरागर,पोतराज रमेश कोडंम,डफ वादक संजय चांदणे,सनई वादक पोपट वैराल,लोककलवंत जगन्नाथ रनसिंग लोककलवंत राहुल मांडलीक,व इतर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे