ब्रेकिंगमहाराष्ट्र
नगर शहरातील ५१ चौकांमध्ये २०४ सीसीटीव्ही कॅमेरा व नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
अहमदनगर प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अहमदनगर शहरातील ५१ चोकांमध्ये २०४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्याचे महसूल तथा अहमदनगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
हे नियंत्रण कक्ष अहमदनगर वसियांच्या सुरक्षेसाठी मोलाची भूमिका बजावेल.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कर्डिले, भाजपा शहर अध्यक्ष श्री. अभय आगरकर यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.