
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तर, वारंवार मराठा आरक्षणाची मागणी केली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या तीव्र आंदोलन करत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनातील घडामोडींकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले असून, यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणले जरांगे पाटील ?
१) मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं – जरांगे
२) सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन – जरांगे
३) आमदारांनी सगेसोयरेचा मुद्दा अधिवेशनात लावून धरावा – जरांगे
४) सगेसोयरेच्या अधिसूचनेवर चर्चा करुन कायदा मंजूर करा – जरांगे
५) कोट्यवधी मराठ्यांची ओबीसीतून आरक्षण मिळण्याची मागणी – जरांगे