१५ ऑक्टोबरपासून नवरात्रारंभ

नवरात्री या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.
१५ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्रीची सुरुवात होणार आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी.
रविवार १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते.
यावेळी शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून २४ ऑक्टोबरला संपणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त केव्हा आणि किती काळ असेल ते जाणून घेऊया.
घटस्थापनेचा शुभ योग
शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग निषिद्ध मानले जातात.
पंचांगानुसार, रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि वैधृती योग सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी असेल. विशेष परिस्थितीत चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग यांचे दोन चरण निघून गेल्यावर घटस्थापना करता येते.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
रविवार १५ ऑक्टोबरला सकाळी चित्रा नक्षत्र आणि वैधृती योगाचे दोन चरण पूर्ण होतील. अशा स्थितीत घटस्थापनाही सकाळी करता येते. तसेच घटस्थापना अभिजीत मुहूर्तात करता येते.
१५ ऑक्टोबर २०२३ रोजी अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल. या काळात घटस्थापना करू शकता.