सेंट विवेकांनद इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात
अहमदनगर प्रतिनिधी

जगात फक्त भारतीय संस्कृतीत अशी आहे ज्यात विविध सण, उत्सव नात्यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट करतात. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतिक म्हणून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
राखीच्या धाग्याने पवित्र नात्याची वीण घट्ट केली जाते. आताच्या पिढीला या सण, उत्सवांची परंपरा माहिती व्हावी, त्याचे जतन व्हावे यासाठी सेंट विवेकानंद स्कूलमध्ये नेहमीच प्रयत्न केले जातात. सामूहिक रक्षाबंधन साजरा करताना मुलामुलींच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद पहायला मिळाला, अशा भावना प्राचार्या गीता तांबे आणि पूर्व प्राथमिक च्या प्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्ताणी यांनी व्यक्त केल्या.
सेंट विवेकानंद हायस्कूलच्या प्री प्रायमरी, प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण शाळेत उत्साहात साजरा केला. चिमुकल्या मुलींनी दहावीतील मोठ्या भावांना राखी बांधली तर दहावीतील मुलींनी लहान भावांना राखी बांधली. एकमेकांना पेढा भरवून तसेच भेटवस्तू देऊन सर्वांनी या सणाचा आनंद लुटला. या माध्यमातून राखीपौर्णिमेचे महत्व, नात्यांमधील मायेचा ओलावा याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.
प्रीती कटारिया , दीपा आहुजा, गुंजन पांज्वानी, कनन शेरवानी, प्रियांका शिंदे, शिरीन शेख, सीमा कोटस्थाने, यांचे मार्गदर्शन लाभले. वंदना नारंग उपस्थित होत्या संस्थेचे अध्यक्ष दामोदर बठेजा, उपाध्यक्ष राम मेंघानी, सचिव रुपचंद मोटवानी, खजिनदार दामोधर मखिजा, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रूपचंद मोटवानी, रामचंद मेंघानी, महेश मध्यान, गोपाल भागवानी, आदींनी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.